विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी अद्यापही सुरू असून विधान भवनात नव्या सभागृहाचे बांधकाम व इतर तयारी रविवापर्यंत पूर्ण करण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळाची बैठक विधान भवनातच घेण्यासाठी जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नवे सभागृह तयार केले जात आहे. तीन महिन्यात म्हणजे ३० ऑक्टोबपर्यंत पूर्ण व्हावयास हवे होते. मात्र, हे काम अद्यापही सुरूच आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कक्षासह इतरही खोल्यांमध्ये रंगरंगोटीसह सुशोभिकरण सुरूच आहे. विधान भवनाच्या आवारात मांडव टाकणे सुरू आहे. तीन अस्थायी उपहारगृहे उभारणे सुरूच आहे.
केनच्या खुच्र्याचे विणकाम, लाकडी खुच्र्याची दुरुस्ती, पॉलिशिंग सुरू आहे. काही खोल्यांमध्ये खुच्र्या, टेबल व संगणक लागली असून ग्रंथालयात पुस्तके कपाटात विसावली आहेत. संगणक लागले आहेत. विविध उपकरणांसाठी आज केबल्स टाकण्यात आले. अनेक खोल्यांमध्ये साफसर्फाची कामे सुरूच आहेत.
दरम्यान, सर्व कामे रविवापर्यंत पूर्ण करून १ डिसेंबरपासून विधान भवन व इतर ठिकाणे सुसज्ज ठेवायची आहेत. त्यासाठी राबणाऱ्यांची लगीनघाई सुरू आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे ४ डिसेंबरला प्रत्यक्ष कामाचा आढावा घेणार  आहेत.