राहुल गांधींना पंतप्रधान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील. गांधींना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सहप्रभारी श्योराज वाल्मीकी यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेसला इतिहास आहे. हा इतिहास लहाणापासून मोठयांपर्यंत आहे. पण भाजपाला कोणताही इतिहास नाही. कारण देशासाठी कुर्बानी देण्याची तयारी फक्त काँग्रेसमध्येच आहे इतर कोणाच्यातही ती तयारी नाही. राहुल गांधी यांनी जो काम करणार नाही तो घरी बसेल असा संदेश दिला असून कार्यकर्त्यांना त्यांनी २०१४ च्या निवडणुकीसाठी कामाला लागा असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीचे नेते घेतील असेही ते म्हणाले.
अन्नसुरक्षा विधेयकामुळे देशातील ८५ टक्के लोकांना अन्नसुरक्षा मिळणार आहे. पण भाजपाचा या विधेयकाला विरोध होता. काँग्रेस जिल्हाअध्यक्ष पी.एन पाटील यांच्याविषयी बोलताना त्यांनी पी.एन पाटील यांना दोनवेळा लाल दिव्याचे आमिष आले हाते, पण ते बळी पडले नाहीत. त्यामुळे २०१४ ला त्यांचा निश्चितच सन्मान होईल असे सांगितले. यावेळी त्यांनी जे गद्दारी करतात ते एक दिवस मातीत मिळतात असे सांगितले.
राहुल गांधीच पंतप्रधान – श्योराज वाल्मीकी
राहुल गांधींना पंतप्रधान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील.
First published on: 07-10-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi will become next pm shyoraj valmiki