येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जवाहर भवनात जुगार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ३ पोलिसांसह ८ शासकीय कर्मचाऱ्यांना मुद्देमालासह पकडले.
येथील जिल्हा परिषद कार्यालयामागे जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी जवाहर भवन बांधण्यात आले आहे. मात्र, या जवाहर भवनाचा दुरुपयोग होत असून त्या ठिकाणी अनेक शासकीय कर्मचारी जुगार खेळत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली.
गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी खाडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार बोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जवाहर भवनावर धाड टाकली असता ३ पोलीस कर्मचारी आणि अन्य ५ शासकीय कर्मचारी जुगार खेळताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्या जवळील ५६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पकडले. या घटनेतील सहभागी आरोपींची नावे सांगण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले.
गडचिरोलीत जुगार अड्डय़ावर छापा, ३ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांना पकडले
येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जवाहर भवनात जुगार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ३ पोलिसांसह ८ शासकीय कर्मचाऱ्यांना मुद्देमालासह पकडले.
First published on: 20-06-2013 at 08:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid on gambling spot in gadchiroli