हिरकणी ग्रुप आँफ पनवेल या संस्थेतर्फे १४ आणि १५ फेब्रुवारी या दिवशी ज्येष्ठ नागरिकांसाठी माफक दरात किल्ले रायगड सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीसाठी मर्यादित जागा असून १४ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता पनवेलहून ही सहल सुरू होईल. याच दिवशी संध्याकाळी तसेच १५ फेब्रुवारीला सकाळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर स्थळदर्शन होणार आहे. सहलीत सहभागी होणाऱ्यांची एमटीडीसीमध्ये निवासाची सोय करण्यात येणार आहे. इच्छूकांनी सोबत थंडीचे कपडे, आवश्यक औषधे घ्यावीत, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. संपर्क- ९९२००१८४९१

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad fort picnic for garndpa and granny