युवक लॉन्सर्स क्रीडा मंडळातर्फे आयोजित शिवकालीन आणि काल्पनिक किल्ले स्पर्धेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.ऐतिहासिक शिवकालीन स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहित लाडसावंगीकर ग्रुप, येरंडे व मित्र परिवार, महाल- ‘रायगड’,  द्वितीय क्रमांक अजिंक्य साठे गणेशपेठ – राजगड (मारूडगड) आणि तृतीय क्रमांक प्रशांत आस्कर, भांडे प्लॉट- नंदीवर्धन- नगरधन(रामटेक) या किल्ल्याला बक्षीस मिळाले. गजानन शाळा नवीन सुभेदार लेआऊट -जंजिरा, विशाल देवकर, बाभूळखेडा- रायगड आणि मोनू राचलवार, संजय गांधीनगर -नंदीवर्धन नगरधन (रामटेक) यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. काल्पनिक किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धेश राऊत (शिवसिद्धार्थ ग्रुप) भरतनगर- अश्वपद गड, द्वितीय क्रमांक मॉडर्न प्रायमरी स्कूल राणी कोठी- राणीमहल आणि तृतीय क्रमांक अनुज शास्त्रकार आनंदनगर, सक्करदरा पोलीस ठाण्यामागे यांना बक्षीस मिळाले तर उत्तेजनार्थ मंगेश बारसागडे, खानखोजेनगर, अजिंक्य इंदूरकर, ओंकार नगर आणि डी.पी. गुजर, वाल्मीकी शाळा, गांधीनगर यांना बक्षीस मिळाले. मान्यवरांच्या हस्ते या बक्षीस प्राप्त स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणूनजयाजीराव मोहिते, प्रकाश जिल्हारे, श्याम साठे आणि अरविंद पांडे यांनी काम पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा