उपनगरीय रेल्वे गाडय़ांच्या क्षमतेपेक्षा कैकपट अधिक प्रवासीसंख्येमुळे रेल्वे प्रवास अधिक धोकायदायक बनला असून त्यामुळे अपघाताच्या शक्यतांमध्ये वाढ झाली आहे. प्रवाशांना सुरळीत वाहतूक सेवा देण्याबरोबरच रेल्वे प्रवासी अपघातग्रस्त झाल्यास त्याला तात्काळ आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी नियमानुसार रेल्वे प्रशासनाची आहे. रेल्वे अ‍ॅक्टमधील तरतुदी आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र तरतुदींचे काटेकोरपालन होत नसल्यामुळे मध्य रेल्वेच्या ठाणे मार्गावरील अपघातग्रस्तांना मुंबईतील रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे. कल्याणमध्ये रेल्वेचे रुग्णालय असूनही अनेकदा जखमी प्रवाशांना तिथे पाठविले जात नसल्यामुळे जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, असा प्रवासी संघटनांचा आरोप आहे.  
मध्य रेल्वेच्या मार्गावरील रोह्याजवळ दिवा- सावंतवाडी पॅसेंजर गाडीचा अपघात झाला. या भागामध्ये रेल्वेची सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था नसल्याने अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये आणण्याची वेळ प्रशासनावर आली. या प्रवासामध्ये काही जखमींचा उपचाराआभावी मृत्यू झाला. रेल्वे अपघातानंतर एका तासाच्या आत जखमींना वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी, असा न्यायालयाचा आदेश असूनही रेल्वेकडे अशी व्यवस्था पुरवणारी यंत्रणा नसल्याने जखमींचे हाल होतात.  ठाण्याच्या पुढील कोणत्याही स्थानकात रेल्वे प्रशासनाची कोणतीही वैद्यकीय सुविधा नाही. मोठा अपघात घडल्यास प्रथमोपचारासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयांवर रेल्वे प्रशासनास अवलंबून रहावे लागत असून गंभीर जखमींना मुंबईशिवाय पर्याय नसल्याचे आजवरचा अनुभव आहे. कल्याणच्या रेल्वे रुग्णालयामध्ये रेल्वे अपघातातील जखमींना नेण्याचे टाळून त्याऐवजी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात येते. तेथे आवश्यक प्रगत सुविधा नसल्याने प्रथमोपचार करून जखमींना मुंबईत हलवले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दादर’चे वैद्यकीय कक्ष लाभदायक
अपघातग्रस्तांसाठी तात्काळ सुविधा पुरवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुंबईतील दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर दोन वर्षांपूर्वी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरवणारा कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा प्रवाशांना लाभ होत आहे. अशा प्रकारचे कक्ष मध्य रेल्वेच्या कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण या स्थानकातही राबवण्यात यावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र रेल्वे त्याकडे लक्ष देत नसल्याची खंत संघाचे मधू कोटीयन यांनी व्यक्त केली असून असा कक्ष सुरू झाल्यास अनेकांना तात्काळ सुविधा मिळू शकेल.