हिंगोलीकरांना रेल्वेसेवा मिळावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आमदार राजीव सातव यांच्या प्रयत्नांमुळे ती पूर्ण झाली. रविवारी रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे यांनी कुर्ला येथे हिरवी झेंडी दाखवून गाडीचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंगोलीकरांची अनेक दिवसांची मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी होती. याकरिता वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली. परंतु म्हणावा तितका प्रतिसाद रेल्वे विभागाकडून मिळाला नसून वारंवार दुर्लक्ष करण्यात येत होते. आमदार राजीव सातव यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर रविवारी दुपारी २ वाजता कुर्ला-व्हाया-हिंगोली-अंजनी एक्स्प्रेस रेल्वेगाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे यांनी हिरवा बावटा दाखविला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. वर्षां गायकवाड, आ. राजीव सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सातव यांच्या प्रयत्नांमुळे हिंगोलीकरांसाठी रेल्वे सुरू
हिंगोलीकरांना रेल्वेसेवा मिळावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आमदार राजीव सातव यांच्या प्रयत्नांमुळे ती पूर्ण झाली. रविवारी रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे यांनी कुर्ला येथे हिरवी झेंडी दाखवून गाडीचा शुभारंभ केला.

First published on: 28-10-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway start for hingoli due to try of mla sataw