हिंगोलीकरांना रेल्वेसेवा मिळावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आमदार राजीव सातव यांच्या प्रयत्नांमुळे ती पूर्ण झाली. रविवारी रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे यांनी कुर्ला येथे हिरवी झेंडी दाखवून गाडीचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंगोलीकरांची अनेक दिवसांची मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी होती. याकरिता वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली. परंतु म्हणावा तितका प्रतिसाद रेल्वे विभागाकडून मिळाला नसून वारंवार दुर्लक्ष करण्यात येत होते. आमदार राजीव सातव यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर रविवारी दुपारी २ वाजता कुर्ला-व्हाया-हिंगोली-अंजनी एक्स्प्रेस रेल्वेगाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे यांनी हिरवा बावटा दाखविला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. वर्षां गायकवाड, आ. राजीव सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा