हिंगोलीकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेले रेल्वेसेवेचे स्वप्न अखेर रविवारी पूर्ण झाले. रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी कुर्ला येथे हिरवी झेंडी दाखवून रेल्वेचा प्रारंभ केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची या वेळी उपस्थिती होती.
हिंगोलीहून मुंबईसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी जुनीच होती. यासाठी वेळोवेळी आंदोलने करून लक्ष वेधण्यात आले. आमदार राजीव सातव यांनी पाठपुरावा केला. रविवारी दुपारी कुर्ला-हिंगोली-अंजनी एक्स्प्रेस गाडीला रेल्वेमंत्री खरगे यांनी हिरवी झेंडी दाखविली. पालकमंत्री वर्षां गायकवाड, आमदार सातव आदी या वेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway started for hingolikars