काश्मीरमध्ये कुपवाडा भागात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सोलापूरच्या वीर जवान मोहसीन गुलाम मोहम्मद शेख यांचे नाव सोलापूर रेल्वे स्थानक ते सात रस्ता-गांधीनगर या मार्गाला देण्यात आले. या मार्गाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
महापौर अलका राठोड व उपमहापौर हारून सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या समारंभात आमदार प्रणिती शिंदे यांनी, शहीद जवान मोहसीन शेख यांचे बलिदान वाया जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत अशा वीर जवानांच्या शौर्यावरच देशाचे अखंडत्व व सार्वभौमत्व टिकून राहिल्याचे नमूद केले. याप्रसंगी माजी महापौर आरीफ शेख, पालिकेचे सहायक आयुक्त पी. वाय. बिराजदार, शहीद मोहसीन शेख यांच्या वीरपत्नी नाजिया शेख, चिमुकली कन्या जोया तसेच माता बिस्मिल्ला व वडील गुलाम मोहम्मद शेख यांची उपस्थिती होती.
शहीद मोहसीन शेख यांच्या मार्गफलकाचे अनावरण
काश्मीरमध्ये कुपवाडा भागात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सोलापूरच्या वीर जवान मोहसीन गुलाम मोहम्मद शेख यांचे नाव सोलापूर रेल्वे स्थानक ते सात रस्ता-गांधीनगर या मार्गाला देण्यात आले. या मार्गाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-01-2013 at 06:33 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway station road sat rasta now known as a shahid mohsin shaikh road