गेल्या दोनतीन दिवसांपासून जिल्हय़ात पावसाच्या लहरीपणामुळे सूर्यदर्शन मात्र घडू शकले नाही. पावसाच्या आगमनामुळे जिल्हाभर समाधानाचे वातावरण आहे.
पुनर्वसू नक्षत्रात पावसाने चांगलाच जोर धरला. एकही दिवस सुटी न घेता जिल्हय़ात कुठे ना कुठे पावसाची हजेरी सुरूच आहे. त्यामुळे पिके जोमात आहेत. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यास शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे हाती घेता येतील. शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. शनिवारी दुपापर्यंत रिपरिप थांबली व नंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी ४२ मिमी पाऊस झाला. यंदाची सरासरी ३७१ मिमीवर पोहोचली. गेल्या २४ तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस, कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे – लातूर ४५ (३२०), औसा ३७ (२६०), रेणापूर २४ (३४६), उदगीर ४३ (४०८), अहमदपूर ३० (४३२), चाकूर ३८ (३७३), जळकोट ३९ (४३५), निलंगा ४५ (३५३), देवणी ६३ (४२०), शिरूर अनंतपाळ ५८ (३५८).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा