राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे लातूर विमानतळावर शुक्रवारी सायंकाळी ६.१० वाजता आगमन झाले. राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी १५ मिनिटे वरुणराजानेही लातुरात हजेरी लावली.
सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची गर्दी जमून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दिवसभर असह्य़ उकाडय़ाने हैराण झालेल्या लातूरकरांना या पावसामुळे सुखद दिलासा मिळाला. अवकाळी पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये मान्सूनच्या पावसाविषयी अपेक्षा वाढतात. पेरणीपूर्व मशागतीला वेग येतो. शेतीच्या मशागतीच्या कामांमध्ये शेतकरी मग्न आहेत.

Story img Loader