जिल्ह्य़ात सलग दोन दिवस झालेल्या ५०० मि.मि.पावसाने या हंगामाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी ३०० मि.मि., तर आज २५१ मि.मि.ची र्पजन्यनोंद झाली आहे. मात्र, अशा संततधार पावसामुळे कु ठेही हानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. आज सकाळपासूनच पावसास सुरुवात झाली. दिवसभरात उन्हाची तिरीपही पडली नव्हती. काळेकुट्ट ढग व संततधार यामुळे जनजीवन ठप्प पडले. आज सर्वाधिक पाऊस देवळी तालुक्यात पडला. तालुकानिहाय नोंद अशी-     वर्धा-३६ मि.मि., सेलू-३३, देवळी-५०, समुद्रपूर-३२, हिंगणघाट-२९, आर्वी-२२, आष्टी-१६ व कारंजा-२६ मि.मि.
भंडारा जिल्ह्य़ात पावसाची झड
वार्ताहर, भंडारा
रविवार, २३ जूनच्या रात्रीपासून पावसाची झड सुरू झाली असून कधी गर्जनेसह धो धो, तर बाकी व़ेळ रिमझिम पाऊस सतत पडत आहे. सूर्यदर्शनही झाले नाही. या उसंतीनंतरच्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. उघाड मि़ळाल्यामु़ळे त्यांची हंगामातील कामे पूर्ण झाली असून धान बियाणे अंकुरण्याची तो वाट बघत आहे. या पावसाचा लाभ घेत बांध्यांच्या धुऱ्यांवर तुरी व भाजीपाला लावायला प्रारंभ झाला आहे. खताचे भाव प्रति गोणीवर ३० ते ७० रुपयांपर्यंत वाढले आहेत. रोवणी व अन्य शेतकामाकरिता मजूर आणि जनावरांची कमतरता भासत आहे. ट्रॅक्टर भाडय़ाने घेतले जातात. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे भाडे प्रतितास सुमारे ४५० ते ५०० रुपये झाले आहे.
वाशीम जिल्ह्य़ात संततधार
वार्ताहर, वाशीम
गेल्या आठवडय़ापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे सोमवारी सायंकाळी आगमन झाले. सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्य़ात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून या पावसाने खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे.
जिल्ह्य़ात मृग नक्षत्राचा जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्य़ातील जलस्रोतामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली.
या पावसाने जिल्ह्य़ातील ८० टक्के शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती, परंतु गेल्या आठवडय़ापासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पेरणी केलेले शेतकरी हवालदिल झाले होते. पेरणी केलेल्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता. अनेकांनी दुबार पेरणीही केली, मात्र सोमवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले असल्याचे वृत्त आहे. जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात सरासरी ३२ मि.मी. पाऊस झाला आहे. वृत्त लिहिपर्यंत जिल्ह्य़ात सर्वत्र संततधार पाऊस सुरू होता.

ल्ल    नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
ल्ल नागपूर-तुळजापूर वाहतूक ठप्प
ल्ल जिल्ह्य़ातील धरणे ओव्हर फ्लो   

‘रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते’
सततच्या पावसामुळे जिल्ह्य़ातील अनेक रस्त्यांची अवस्था ‘रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते’ अशी झाली आहे. विदर्भातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणूकेच्या माहूरला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. माहुर-रुई, माहुर-गुंडवळ, माहूर-हडसणी या रस्त्यांची अवस्था तर दयनीय झाली आहे. रस्त्यातील हे खड्डेच अपघातांना निमंत्रण देत आहेत. जूनमध्ये सरासरीपेक्षा दीड पट पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी झपाटय़ाने पेरण्या सुरू केल्या होत्या पण, मध्येच पावसाने दडी मारल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीच्या संकटाचा  सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा आणि बी-बियाणे मोफत देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Story img Loader