गेले दोन दिवस अवेळी येण्याची पुर्वसूचना देणाऱ्या अवकाळी पावसाने अखेर आज हजेरी लावली. सावेडी परिसरात मुसळधार व इतरत्र मात्र भूरभूर असा थोडा पाऊस आज शहरात झाला.
उन्हाळ्याची चाहूल लागतानाच पावसाचे वातावरण तयार झाले होते. त्याचा पत्ता मात्र नव्हता. हवा दमट व्हायची, रात्री गरम व्हायचे, सकाळचे कडक ऊन पडायचे, आता येईलच असे वातावरण व्हायचे, पण तो यायचा मात्र नाही. आजही दिवसभर असेच दमट हवामान होते. दुपारी तर पाऊस येणारच असे आकाशही झाकोळून आले.
सायंकाळी मात्र एकदम वारा सुटला. हवा ओलसर झाली. सावेडीत त्याने सुमारे तासभर मुसळधार हजेरी लावली. अन्य ठिकाणीही त्याने शिडकावा केला. संगमनेरला परवा पाऊस झाला. त्यानंतर तो इथेही येणार अशी चिन्हे दिसत होती, ती आज रात्री खरी ठरली. पाऊस आला, मात्र तो अवकाळी असल्याने पावसाळ्यात होते तसे वातावरण काही आल्हाददायक झाले नाही. शेतीसाठीही हा पाऊस फारसा उपयोगाचा नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा