कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठचा पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला. मात्र, चालू हंगामाच्या पहिल्या सत्रात कोसळलेला एकंदर पाऊस समाधानकारक असून, दुष्काळी भागातही कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. कोयना जलाशय ४२ टक्क्यांवर भरले असून, धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी बळीराजा उत्साहाने शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे सुखद चित्र आहे.
सातारा जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस, कंसात एकूण पावसाची आकडेवारी सातारा ०.२(२००), जावली ०.७(४५५.७), कोरेगाव शून्य (१४२.८), वाई शून्य (२६६.५), महाबळेश्वर २.८(५२१.६), खंडाळा ८.४ (१६९.७), फलटण ४.३ (९२), माण १.७(६५.४) तसेच खटाव तालुक्यात ०.८ (९४) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
१ जूनपासून कोयना धरणाच्या जलपातळीत सुमारे १६ फुटाने तर पाणीसाठय़ात सुमारे १३ टीएमसीने वाढ झाली आहे. आज सायंकाळी ५ वाजता कोयना धराणाची जलपातळी २ हजार १०० फुट ८ इंच राहताना पाणीसाठी ४४.२८ टीएमसी म्हणजे ४२.०७ टक्के आहे. पैकी ३९.०३ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे धरणाखालील पाटण व कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा, कोयना नद्या दुथडी भरून वाहात आहेत.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रात सरासरी सरासरी ८.५ एकूण ११४७.७५ पाटण तालुक्यात २.५ एकूण ३७०.४१ तर, कराड तालुक्यात ०.५ एकूण १५२.९० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील महाबळेश्वर विभागात १० एकूण १२७४, नवजा विभागात १२ एकूण १११२, कोयनानगर विभागात ५ एकूण १०३० तर प्रतापगड विभागात ६ एकूण १२०२ मि.मी. पाऊस होताना दिवसभरातील सरासरी पावसाची नोंद ८.२५ मि.मी. एकूण ११५४.५० झाली आहे. एकंदर पावसात कोयना धरण क्षेत्रात महाबळेश्वर विभागात १२७४ मि.मी., पाटण तालुक्यात पाटण विभागात सर्वाधिक ४१९ मि.मी. तर तारळे विभागात सर्वात कमी १२२ मि.मी. एकंदर पावसाची नोंद झाली आहे. कराड तालुक्यात कोळे मंडलात सर्वाधिक २२६.९ तर, शेणोली मंडलात सर्वात कमी ११५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कराड व पाटण तालुक्यात ढगाळ वातावरण राहताना सर्वत्र पावसाची हलक्या कोसळत राहिल्याने जनजीवन विस्कळीत असल्याचे वृत्त आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी पावसाचा जोर ओसरला
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठचा पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला. मात्र, चालू हंगामाच्या पहिल्या सत्रात कोसळलेला एकंदर पाऊस समाधानकारक असून, दुष्काळी भागातही कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain power reduced in krishna koyna dam