शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने शहरातील सर्वपक्षीय दिग्गज नेते मंगळवारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. पक्षभेद विसरून बाळासाहेबांची महती सांगत असा नेता पुन्हा होणार नसल्याची भावना सर्वानीच व्यक्त केली. नोकरी मिळत नव्हती म्हणून हातगाडी ओढत होतो. मात्र, बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला आणि आमदार व खासदार झालो, असे गजानन बाबर म्हणाले. तर, राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे हीच बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल, असे राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनी नमूद केले.
िपपरीत डॉ. आंबेडकर चौकात बाळासाहेबांना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रध्दांजली वाहिली. खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर, श्रीरंग बारणे, आझम पानसरे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, एकनाथ पवार, भगवान मनसुख, मनोज साळुंके, चंद्रकांता सोनकांबळे, रंगनाथ फुगे, राजू मिसाळ, अमर साबळे, सुलभा उबाळे आदींसह नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सारंग कामतेकर यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा