मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन बोडके यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्कारार्थीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, अजिंक्य दुधारे यांसह आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये विशेष नैपूण्य दाखविणारी शरीरसौष्ठवपटू दुर्गा जाधव, हितेश निकम, राहुल बोडके, प्रमोद पाळदे, भरत ठाकूर, जलतरणपटू सर्वेश सूर्यवंशी, नेमबाज पंकज देसाई, सागर उपरे, इफ्तेखार कादीर, रोशन काशिफ, नितीन चौहान, महेश आव्हाड तसेच प्रशिक्षक राजेंद्र सातपूरकर, सारंग नाईक, अनुपम सराफ, उमेश पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मनसे जिल्हा सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार, शहराध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले, गटनेते अशोक सातभाई आदी उपस्थित होते.

Story img Loader