महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (रविवारी) लातूर दौऱ्यावर येत असून त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहावर असणार आहे. राज यांच्या मराठवाडा दौऱ्यास शनिवारी प्रारंभ झाला. रविवारी जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका ते घेणार आहेत.
तावडे यांचा उद्या दौरा
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी ते करणार आहेत.
सोमवारी (दि. २५) औसा तालुक्यातील बोरफळ, शिवली येथे भेट, औसा तालुक्यातील सोरडी येथे दुष्काळी परिषदेस उपस्थिती, लातूरला मुक्काम व मंगळवारी (दि. २६) सकाळी टंचाई आढावा बैठक, शिरूर अनंतपाळ येथे टंचाई बैठक घेणार आहेत.

Story img Loader