राज ठाकरे यांची वृत्ती करायचे एक आणि बोलायचे एक अशी असून त्यांच्याकडून तरुणांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. विकास व रोजगार हवा असेल तर काँग्रेसला पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी हे भाष्य केले.
लोकसभेच्या जागा कोणाला आणि कशा जाणार हे आघाडीनंतर निश्चित होणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असले तरी ज्या पक्षाचा उमेदवार सध्या प्रतिनिधित्व करत आहे, त्याच पक्षाला ती जागा सोडण्याचा फाम्र्युला आहे.,’ असे सूचक वक्तव्य करत ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसचा अप्रत्यक्ष दावा केला.
बेळगाव प्रकरणी राज्य सरकार मराठी माणासांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह मराठी माणसावर सरकारने आकसापोटी गुन्हे दाखल केले आहेत. आर.आर. पाटील यांच्या मागे राज्य सरकार ठामपणे उभे राहणार आहे. कर्नाटक सरकारच्या या कृतीचा निषेध करत कर्नाटक सरकारशी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाकरे यांनी गोकुळसह केडीसीसीच्या निवडणुकांना एकदिलाने सामोरे जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांना सांगितले असून नेत्यांतील मदतभेद जिल्हानिहाय बठक घेऊनच ते स्थानिक पातळीवर सामोपचाराने मिटवावेत असेही बजावल्याचे स्पष्ट केले. वैद्यकीय मंत्री विजय कुमार यांनी केलेल्या शिवीगाळप्रश्नी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना ठाकरे यांनी राजकीय नेतृत्वाने विचारपूर्वकच शब्द वापरणे महत्त्वाचे आहे. त्यांचे कोणत्याही प्रकारे सर्मथन होऊ शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा