महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने येथे शनिवारी दुपारी दोन वाजता केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष मुकुंद पालटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सातपूर रोडवरील गोदावरी हॉलमध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांनी दिली.
मध्यवर्ती महासंघाशी संलग्न जिल्हा संघटनांच्या कामांचा आढावा घेणे, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीक्षण अधिनियम २०११च्या अंमलबजावणीमुळे कामगार चळवळीच्या घटनात्मक हक्कांबाबत रणनीती निश्चित करणे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करून सरकारशी विचारविनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महासंघाची धोरणात्मक भूमिका निश्चित करणे, सरकारी रुग्णालयातील लोकहिताच्या सेवांचे खासगीकरणाच्या सरकारी निर्णयाबाबत चर्चा करणे, नाशिक जिल्हा शाखेस मान्यता, महासंघाच्या   दुसऱ्या   अधिवेशनाच्या आयोजनाबाबत    विचारविनिमय आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.

Story img Loader