दिवाळीच्या पाडव्याला साम टीव्हीवर राजेश खन्नाची गाजलेली गाणी नवीन कलावंत सादर करणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘राजेश खन्ना – द सुपरस्टार’ हा कार्यक्रम दाखविला जाणार आहे.
हॅप्पी लकी एण्टरटेन्मेंटने राजेश खन्नाला सांगितिक आदरांजली वाहणारा कार्यक्रम साम टीव्हीच्या सहकार्याने आयोजित केला होता. राजेश खन्ना म्हटले की, ‘मेरे सपनों की रानी’, ‘दुनिया में लोगोंको’, ‘बहारों मेरा जीवन भी सवारो’, ‘हमे तुमसे प्यार कितना’, ‘ये जो मोहब्बत है’, ‘चला जाता हूँ कीसी की धून में’ अशी गाजलेली गाणी लगेच आठवतात. ही सगळी गाणी अमेय दाते, संजीवनी भिलांडे, चिंतन बाकीवाला, मिलिंद इंगळे, रवी त्रिपाठी, वैशाली सामंत, श्रीकांत नारायण आदी गायक-गायिका सादर करणार आहेत. राजेश खन्ना-शर्मिला टागोर, राजेश खन्ना-आशा पारेख, राजेश खन्ना-मुमताज या हिंदीच्या रूपेरी पडद्यावर गाजलेल्या जोडय़ांचे अनेक चित्रपट सहजपणे आठवतात. राजेश खन्नाची स्टाईल, त्याला मिळालेली गाणी, त्याच्या नायिका यामुळे त्याला मिळालेली लोकप्रियता, डिम्पल कपाडियासोबत त्याने केलेला विवाह यांसारख्या अनेक गोष्टी चटकन आठवतात. राजेश खन्नाच्या आठवणीही या कार्यक्रमामध्ये जागविल्या जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा