राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लोकार्पण सोहळा पंचायत राज्य समितीचे अध्यक्ष तथा आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते वसमत येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी दीपाली मोतियाळे, माजी आमदार मुंजाजीराव जाधव, पोलीस उपअधीक्षक पीयूष जगताप, तहसीलदार अरिवद नर्सीकर आदींची उपस्थिती होती. प्रसाद लालपोतु यांनी योजनेसंबंधी, तसेच हेल्थ कार्ड वितरण प्रणालीविषयी विस्ताराने माहिती दिली. प्रातिनिधिक स्वरूपात ११ लाभार्थ्यांना आमदार दांडेगावकर यांच्या हस्ते या वेळी हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.

Story img Loader