राजलक्ष्मी नागरी सहकारी मल्टिस्टेट संस्थेच्या विकासासोबतच ठेवी सुरक्षिततेला प्राधान्य देणे, गोदाम व्यवसाय, शेतीनिगडीत उद्योगाला प्रोत्साहन, सभासदांना उत्कृष्ट बँकिंग सेवा कार्यक्षेत्र विस्तारासह, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन हेच संचालक मंडळाचे ध्येय असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तायडे यांनी सांगितले. संस्थेची बारावी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेत डॉ. अनुपमा डोंगरे शिक्षण सेवा, शेतीनिष्ठ शेतकरी अरविंद बेंडे, वॉटर हार्वेस्टिंगकरिता ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंतराव चिंतावार, संताजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उत्तम गुल्हाने, उपाध्यक्ष गोपाळ पाटील, सचिव सुरेश अजमिरे, अंकेक्षक डॉ. संजय अंबाडेकर, अरविंद पाध्ये, सचिव वसंत पांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सभेला राधेश्याम गुप्ता, अनिल विश्वरूपे, क्षितिज तायडे, बाबुसिंग कडेल, अभय चोपडे, यू.डी. आगरे, प्रा. सुधीर त्रिकांडे, घनश्याम ढेंगळे, संध्या तायडे, कविता अजमिरे उपस्थित होते. सचिव रमेश वटी यांनी अहवाल वाचन केले. सुरेश अजमिरे व वंदना नखाते यांनी आभार मानले.
‘वॉचविटझ् टेक्नॉलॉजी’चा नवा उपक्रम
वॉचविटझ् टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे ‘आयटी’ क्षेत्रातील गुणवत्ता निवडून आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ‘अ‍ॅप्रॉप्स गम्पशन इनिशिएटिव्ह’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती वॉचविटझ्चे संचालक कृणाल कर्णिक यांनी परिषदेत दिली. विकास व संशोधक संस्था देशात ‘आयटी’ क्षेत्राला अनुकूल असलेल्या गुणवत्तेची पारख करतात. ही पारख विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांच्या टक्केवारीवरून केली जाते परंतु टक्केवारी आणि गुणवत्तेमध्ये मोठा फरक आहे. शिक्षण घेणारे आणि पदवी प्राप्त करणारे सर्वच विद्यार्थी या निवडीस पात्र असतात. त्यामुळे कंपन्यांना हवी असलेली गुणवत्ता निवडण्यास त्यांच्या प्रतिनिधींना पुढाकार घ्यावा लागणार आहे. आयटी क्षेत्रासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता पुढे आणण्याच्या दृष्टीने अ‍ॅप्रॉप्स गम्पशन शिष्यवृत्ती व प्रज्ञा शोध उपक्रम ९ फेब्रुवारी २०११ पासून राज्यात सुरू करण्यात आला. यंदा हा उपक्रम २० सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क (एसटीपी) सॉफ्टवेअर एक्सपोटर्स असोसिएशन तसेच इंडियन स्टेप्स अ‍ॅण्ड
बिझनेस अन्क्युबेटर्स स्टेप्स असोसिएशनचे सहकार्य मिळत आहे. प्रवेश घेण्याची मुदत १५ सप्टेंबपर्यंत असल्याचे कर्णिक यांनी सांगितले.
पाण्यामध्ये ‘एरोबिक्स’
शहरातील गांधीसागर तलावाजवळील ‘ए वन एक्वाएरोथायमिक्स फिटनेस सेंटर’मध्ये पाण्यामध्ये ‘एरोबिक्स’ची अभिनव सुविधा उपलद्ध करून देण्यात आली आहे. यामुळे व्यायामासोबतच भरपूर आनंद लुटता येतो. पूर्ण वातानुकूलित फिटनेस स्टुडिओत ही सुविधा आहे. ‘ए वन एक्वाएरोथायमिक्स’ हे समाजातील सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी होऊ शकतात. या ठिकाणी डॉक्टर्स आणि प्रशिक्षित इंस्ट्रक्टर्सची चमू सेवेसाठी आहे. डॉ. शिशीर कोल्हे आणि सुनीता कोल्हे हे या सेंटरचे प्रमोटर आहेत. १५ सप्टेंबपर्यंत दररोज सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत विनाशुल्क चाचणी केली जाणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा