राजूर ग्रामपंचायतीने रस्ताबांधणीसाठी जुना बाजार नविन पिंपरकणे रोडवर हालविल्यामुळे राजूर व्यापारी असासिएशनने बंद ठेउन निषेध नोंदविला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही बंदला पाठिंबा देताना आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच कारणावरून सरपंच हेमलताताई पिचड व डॉ. किरण लहामटे यांच्यात शाब्दीक चकमकही उडाली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. मधुकरराव पिचड यांनी आहे त्या ठिकाणीच बाजार भरवा असा आदेश दिल्याने वातावरण शांत झाले व बाजार द्गिंबर रोडवर तीन तासाच्या प्रतिक्षेनंतर सुरु झाला. होळीचा बाजार असल्याने लोकांचे मात्र हाल झाले. सध्या रस्त्याचे काम सुरु असून त्याठिकाणचा बाजार पिंपरकणे रोडवर भरविण्याचा घाट ग्रामपंचायतीने घातला होता.

Story img Loader