विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाटी सिटूने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकार विरोधात ‘जबाब दो’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाची सुरूवात सकाळी १०.३० वाजता गोल्फ क्लब मैदानापासून होणार आहे. मोर्चाचे नेतृत्व सिटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, आर. एस. पांडे, श्रीधर देशपांडे हे करणार आहेत. किमान वेतन १० हजार रुपये करावे, त्यासोबत महागाई भत्ताही द्यावा, संघटीत व असंघटीत क्षेत्रातील सर्वाना निवृत्ती वेतन द्यावे, सामाजिक सुरक्षा लागू करावी, भविष्यनिर्वाह निधी व बोनसवरील सेलिंग रद्द करावे, कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांप्रमाणेच समान कामास समान वेतन द्यावे तसेच कायम करावे, म्हाडा, सिडको व महानगरपालिका यांच्याव्दारे सर्व गरजू कष्टकऱ्यांसाठी २५ हजार रुपयांची योजना राबविण्यात यावी, आदी मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने सिटूच्या वतीने सादर करण्यात येणार आहेत. मोर्चात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन अ‍ॅड. वसुधा कराड, कल्पना शिंदे, बी. एम. चौधरी आदिंनी केले आहे.

Story img Loader