भारताच्या युवा पिढीपुढे पोलिओनंतर आता क्षयरोग निर्मूलनाचे मोठे आव्हान आहे. ते त्यांनी सामूहिकपणे स्वीकारावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एम. पी. परचंड यांनी केले. जागतिक क्षयरोगदिनानिमित्त आयोजित क्षयरोग प्रबोधन मास विविध कार्यक्रमांचा समारोप शालेय विद्यार्थी-स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने निघालेल्या रॅलीने झाला. जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे त्याचे आयोजन करण्यात आले होते.    
प्रारंभी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अनिता सैबन्नावर, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी सर्वाचे स्वागत करून वर्षभर निर्मूलनासाठी करण्यात आलेल्या सामाजिक व आरोग्यविषयक कामाचा आढावा घेतला. भारतामध्ये पोलिओ उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी महिती त्यांनी या वेळी दिली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण नाईक यांच्यासह सर्व विद्यार्थी व उपस्थितांनी क्षयरोग निर्मूलनाची शपथ घेतली.    
या वेळी शाहीर रंगराव पाटील-महेकर यांनी कलाकारांसमवेत महाराष्ट्रगीत व पोवाडा, पथनाटय़ सादर केले. ही रॅली सीपीआर आवारातून दसरा चौक, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन, बिंदू चौक, शिवाजी चौक, महापालिका मार्गे सीपीआर येथे समाप्त झाली. या वेळी रांगोळी व पोस्टर्स प्रदर्शनाची पाहणी ऑडिटोरियम हॉल येथे विद्यार्थी वर्गाने पाहणी केली. नंतर या सर्वाना गोकुळ दूध संघामार्फत लस आणि महावीर सेवा धामगुजरी यांच्यामार्फत बिस्किटे तसेच पीएसआय संस्थेतर्फे टोपी व रुमाल यांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रवीण ओसवाल, उत्तमभाई गांधी, डॉ. दिलीप बांदिवडेकर, आर. के.मेहता, सुलोचना पाटील आदी उपस्थित होते.  

Story img Loader