सिकलसेलग्रस्तांच्या मागण्या शासनाकडे प्रलंबित असून त्याकडे लक्षच दिले जात नाही. त्यामुळे रुग्णांच्या त्रासामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनुवाशिंक आजाराने ग्रस्त असलेल्यांना उपचारासाठी ये जा करण्यासाठी  एस.टी. बसमध्येही सवलत दिली जात नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये असंतोष आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियातर्फे २० सप्टेंबला मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सिकलसेल रुग्ण व त्यांचे पालक सहभागी होणार आहेत.
राज्य शासनातर्फे गेल्या १४ वषार्ंपासून सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असला तरी या समस्येवर नियंत्रण करण्यास आणि रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यास शासन अपयशी ठरले आहे. सिकलसेलग्रस्तांच्या दहा शिफारशी लागू करण्यासाठी लोकायुक्तांनी २० एप्रिल २०११ ला राज्य शासनास सूचना केली, परंतु अद्याप त्या संदर्भात राज्य सरकारने पुढाकार घेतलेला नाही.
मेयो रुग्णालयापासून दुपारी २ वाजता ही मिरवणूक निघणार असून ती संविधान चौकात पोहोचणार आहे. त्या ठिकाणी छोटेखानी सभा होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. सिकलसेलग्रस्तांसाठी केलेल्या दहा शिफारशी लागू करा, रुग्ण व सोबत्याला एस.टी प्रवास भाडय़ात सवलत देण्यात यावी, महाराष्ट्र राज्य सिकलसेल नियंत्रण संस्था नागपुरात स्थापन करा, राज्य सिकलसेल नियंत्रण व उपचार कायदा करा, चार पैकी दोन मॉजेले (मॉलिक्युअर जेनेटिक लेबॉररी) विदर्भाला द्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेची उत्पन्न मर्यादा १ लाखापर्यंत वाढविण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी नीळकंठ पांडे, (९४२२१४२५१९), संजय गजभिये (९४२२८०८६२९) आणि प्रमोद धनविजय (७८७५७६१००४) संपर्क साधावा.

Story img Loader