जागतिक मधुमेहदिनानिमित्त मधुमेहतज्ज्ञांच्या पुढाकाराने शहरात गुरुवारी जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली.
गांधी चौकात सकाळी गोपीकिशन भराडिया, ईश्वर राठोड, हमीद चौधरी, परमेश्वर सूर्यवंशी, गजानन गोंधळी, रायभोगे आदी डॉक्टरांच्या पुढाकाराने वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, परिचारिका, औषध विक्रेते आदींचा सहभाग असलेली रॅली काढण्यात आली. देशात प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक मधुमेहाने पीडित आहे. शारीरिक श्रम करा, दुचाकीऐवजी सायकलचा वापर करा, संतुलित आहार घ्या असे फलक रॅलीतील सहभागींच्या हातात होते. रविवारी (दि. १७) मधुमेह संदेश या विषयावर दयानंदच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत गांधी चौकात मोफत मधुमेह चाचणी डॉक्टरांच्या पुढाकाराने करण्यात आली.

Story img Loader