दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे चर्चेत आलेल्या आम आदमी पक्षाची जाहीर सभा येथील जमनालाल बजाज रस्त्यावर शुक्रवारी दुपारी चार वाजता होणार आहे.
पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक अंजली दमानिया आणि सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे सेवानिवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे हे या सभेत भाषण करणार आहेत. धुळे महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. यात रूसव्या-फुगव्यावरून हाणामारीचे प्रकार अद्यापही सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर दमानिया आणि पांढरे यांची सभा होत  आहे. ते धुळ्यातील कोणत्या राजकीय नेत्यास लक्ष्य करतात, याकडे धुळेकरांचे लक्ष आहे. सभेस जिल्ह्य़ातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आम आदमी पक्षाचे जिल्हा समन्वयक राहुल भारती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

Story img Loader