थकीत वेतनासह अन्य मागण्यांसाठी महापालिकेवर कर्मचारी संघटनेने शुक्रवारी मोर्चा काढला. शनिवार बाजार येथून निघालेला मोर्चा महापालिकेपुढे विसर्जित झाला. मोर्चेकऱ्यांच्या वतीने आयुक्त सुधीर शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. बुधवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. महापौर प्रताप देशमुख, आयुक्त शंभरकर यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींशी दोन तास चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. परिणामी, कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. के. आंधळे यांच्यासह कॉ. राजन क्षीरसागर, आनंद मोरे, मुक्तसिद खान, के. के. भारसाकळे, मुकुंद मस्के, अनसूया जोगदंड, माणिक बोराडे आदींच्या उपस्थितीत आयुक्त शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा