उसाला पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आजरा येथे शुक्रवारी आंदोलन केले. शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
उसाला पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, अंतिम दर ३ हजार ५०० रुपये मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे. याअंतर्गत आजरा तहसील कार्यालयावर शिवसैनिकांनी शुक्रवारी मोर्चा काढला. जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख राजू सावंत, संजय पाटील, संजय ऐसाटे, देवराज माडभगत, दिनकर धामणकर, सुषमा चव्हाण, मालिनी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांनी रास्ता रोको केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. साखर कारखाने सुरू होण्यास विलंब असल्याने त्याकडे लक्ष न दिल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देवणे यांनी दिला

Story img Loader