केंद्रातील महिला खासदारांच्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी यासह राज्यात एकात्मक सेवा योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या इतर मागण्या मान्य न झाल्यास लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनचे सचिव कॉ. राजेंद्र बावके यांनी दिला.
अंगणवाडी कर्मचारी दि. २० व २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार असून या काळात सरकारने दखल न घेतल्यास मंत्रालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याच्या तयारीसाठी राहाता तालुक्यातील साकुरी येथे मेळावा घेण्यात आला, त्यावेळी बावके बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉ. शरद संसारे होते.
बावके म्हणाले, राज्यात एकात्मिक सेवा योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अनुक्रमे वर्ग ३ व वर्ग ४ च्या श्रेणीत घेण्यात यावे, प्राथमिक शाळेप्रमाणे उन्हाळ्याची सुट्टी मिळावी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शनचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी होत आहेत, अशी माहिती दिली.

Story img Loader