राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेची माहिती देणाऱ्या प्रचार रथाला अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी हिरवा बावटा दाखवून रवाना केले. केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व राज्य शासनाच्या महा ई-सेवा केंद्रांच्या संयुक्त प्रयत्नातून हा रथ तयार करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी, केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रवीण चांदेकर, रिलायंस ग्रुपचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीपाद सुभेदार याप्रसंगी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात संगणकाची फित कापून अनिल देशमुख यांनी उद्घाटन केले. हा प्रचार रथ २२ डिसेंबपर्यंत नागपूर जिल्ह्य़ात फिरणार आहे. जिल्ह्य़ातील चाळीस गावात तो जाईल. महा ई सेवेतर्फे देण्यात येणाऱ्या सेवेची माहिती पथनाटय़ाद्वारे दिली जाईल. सतरा प्रकारची प्रमाणपत्रे तसेच इतरही सार्वजनिक सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून देण्यासंदर्भातील माहिती सामान्य जनतेला देण्याचे काम या प्रचार रथातून केले जाणार आहे.
 नाागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ातही हा प्रचार रथ जाईल. यावेळी रिलायंस कंपनीचे नोबेन्दु रॉय, मंगेश गायकवाड, यशवंत पवनीकर, समीर पाटील आदी हजर होते.    

Story img Loader