अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनीफितीचे प्रकाशन नुकतेच मुंबईत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांच्या हस्ते झाले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील कलावंत ‘त्या’भूमिकेतील वेशभूषेसह उपस्थित होते. त्यामुळे सांगीतिक सोहळ्यात जणू पेशवाई अवतरली होती.
दिवंगत गीतकार-कवी सुधीर मोघे आणि दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांचे एकत्र काम असलेला हा शेवटचा चित्रपट. त्यामुळे या सोहळ्यात दोघांच्या आठवणींना उजळा देण्यात आला. चित्रपटातील ‘हमामा रे पोरा’ या संत ज्ञानेश्वर यांच्या रचनेला सुधीर मोघे यांनी बालगीतात गुंफले आहे. कार्यक्रमास आलोक पेठे, पर्ण राजवाडे, रवींद्र मंकणी, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, श्रुती मराठे, डॉ. अमोल कोल्हे, सुचित्रा बांदेकर आणि मृणाल देव-कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘रमा माधव’च्या सांगीतिक सोहळ्यात ‘पेशवाई’ अवतरली
अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनीफितीचे प्रकाशन नुकतेच मुंबईत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांच्या हस्ते झाले.
First published on: 01-08-2014 at 01:34 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rama madhav marathi movie music launched