भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे, तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी संतोष हंगे व सरचिटणीसपदी अ‍ॅड. सर्जेराव तांदळे यांना संधी मिळाली. आमदार पंकजा पालवे यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली.
पक्षाचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आर. टी. देशमुख यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. देशमुख यांच्या काळात २००४ च्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. तत्कालीन अध्यक्ष फुलचंद कराड यांनी पक्षांतर केल्यानंतर १२ वर्षांत राजकीय वातावरण बरेच बदलले. विद्यार्थिदशेपासून चळवळीत सक्रिय असलेले पोकळे हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात आले.
 जि.प. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले संतोष हंगे, तसेच अ‍ॅड. सर्जेराव तांदळे या तरुण कार्यकर्त्यांनी जिल्ह्य़ात मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटना बांधणीचे काम केले. आमदार पालवे,
माजी आमदार श्रीकांत जोशी, पाशा पटेल यांच्यासमवेत कार्यकर्त्यांच्या बैठकीत पोकळे यांची एकमताने निवड झाली.

Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Vinod Tawde pune, Mahayuti, Maratha Reservation,
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
vikas kumbhare
भाजप आमदाराचा थेट काँग्रेस उमेदवाराला आशीर्वाद… मध्य नागपूरात…
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Phulumbri Assembly Constituency Assembly Election 2024 Challenge to BJP in Haribhau Bagde constituency
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
Bunty Shelke arrived with a fogging machine due to the increase in mosquitoes nagpur news
नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…