भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे, तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी संतोष हंगे व सरचिटणीसपदी अॅड. सर्जेराव तांदळे यांना संधी मिळाली. आमदार पंकजा पालवे यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली.
पक्षाचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आर. टी. देशमुख यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. देशमुख यांच्या काळात २००४ च्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. तत्कालीन अध्यक्ष फुलचंद कराड यांनी पक्षांतर केल्यानंतर १२ वर्षांत राजकीय वातावरण बरेच बदलले. विद्यार्थिदशेपासून चळवळीत सक्रिय असलेले पोकळे हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात आले.
जि.प. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले संतोष हंगे, तसेच अॅड. सर्जेराव तांदळे या तरुण कार्यकर्त्यांनी जिल्ह्य़ात मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटना बांधणीचे काम केले. आमदार पालवे,
माजी आमदार श्रीकांत जोशी, पाशा पटेल यांच्यासमवेत कार्यकर्त्यांच्या बैठकीत पोकळे यांची एकमताने निवड झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा