ज्येष्ठांच्या फॅशन शोने मने जिंकली
ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी धमाल मस्ती करीत तरुणाईला लाजवेल अशा वेगवेगळ्या वेषभूषेत रॅम्प वॉक करून रसिकांची मने जिंकली. ज्
येष्ठ नागरिकांच्या फॅशन शो मध्ये महिलांमध्ये शिखा रॉय यांना प्रथम तर कल्पना दखणे यांना द्वितीय आणि पुरुषांमध्ये चंद्रशेखर खोकले यांना प्रथम तर सुरेशकुमार मोर्य यांना द्वितीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सीएसी ऑलराऊंडर, मैत्री परिवार संस्था आणि विष्णू एन्टरटेनमेंटच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला बजाजनगरातील ‘विष्णुजी की रसोई’त ज्येष्ठ नागरिकांचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या अभिनव अशा कार्यक्रमाला रसिकांनी चांगली गर्दी केली होती. या शोमध्ये बेस्ट स्माइल- अनिता सारडे, वेस्ट वॉक – छोबी चक्रवर्ती, सर्वात वयोवृद्ध नागरिक – मनोहर जोशी, सर्वात तरुण- वैभवी मर्जिवे, परीक्षक निवड- शक्ती रतन यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. एरवी फॅशन शो म्हटला की युवक युवती रॅम्पवर वेगवेगळे पोशाख घालून समोर येत असतात मात्र या अभिनव आणि आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमात साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मात्र धमाल करून परीक्षकांसह रसिकांची भरभरून दाद मिळविली. देविका राणी पासून प्राण, मेहमूद, दारासिंग अमिताभ बच्चन, मिथून चक्रवती, रेखा, माधुरी दीक्षितपर्यंत अभिनेता-अभिनेत्रींच्या वेषभूषेत या ज्येष्ठ नागरिकांनी रॅम्पवर प्रवेश करून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. या फॅशन शोमध्ये ४० ज्येष्ठ नागरिकांनी नावे नोंदविली होती. तीन फे ऱ्यांमध्ये हा शो सादर करण्यात आला. त्यात पहिल्या फेरीत बॉलिवुड रेट्रो, दुसरी फेरी जुन्या नवीन चित्रपट अभिनेत्यांची वेशभूषा आणि तिसऱ्या फेरीत फॅन्सी ड्रेस व शेवटच्या फेरीत दैनंदिन जीवनातील वेशभूषेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी सादरीकरण केले.
अनोख्या फॅशन शो मध्ये ५७ ते ८८ या वयोगटातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यात ८८ वर्षांचे मनोहर जोशी यांनी प्राणच्या वेशभूषेत प्रवेश करताच रसिकांनी त्यांना टाळ्याचा कडकडाट करीत दाद दिली. फॅशनच्या शोच्या सरावा दरम्यान हृदयविकाराचा झटका आलेल्या एका महिलेने वैजयंतीमालाच्या भूमिकेत प्रवेश करून ‘मै अभी ठीक हू’ असा जणू संदेश दिला. या फॅशन शो मध्ये संध्या म्हैसाळकर, जयंत आपटे, सुधाकर सारडे, विश्वास पत्तरकीने, मनोहर जोशी, सुधाकर गेडाम, सर्जेराव गलपत, प्रभाकर साठे, सुरेशकुमार मोर्य, स्मिता तांबोळी, कल्पना दखणे, बालकिसन चांडक, भीमराव कांबळे, डी.पी. ठाकरे, एम.जे मुदके, कृष्णा कपूर, गोपाळ केशव गोखले, रेणू श्रीवास्तव, सुगुना राव, छोबी चक्रवर्ती, प्रभाकर घारपुरे, शोभा वंजारी, शक्ती रतन, अनंत देशपांडे, नंदा देशपांडे, परसराम नागरिकर, रेणुका लिमसे, शिखा रॉय, राम कुळकर्णी, प्रमोदिनी कुळकर्णी, रेखा सोळंखे, आशा जामकर, अशोक जामकर, प्रभा दिवाळे, रोहिणी पाठक, कल्पना भाईक, वैभवी मर्जिवे, स्नेहा गोखले, अशोक पात्रीकर आणि चंद्रशेखर गोखले सहभागी झाले होते.
गाण्यांनी रंगत वाढवली..
संगीतकार आणि गायक पिंकू जोसेफ यांनी सादर केलेल्या जुन्या नव्या गीतांनी कार्यक्रमात अधिक रंगत आणली. पिंकूच्या गाण्यावर ज्येष्ठ नागरिकांचे पाय थिरकले. या शोमध्ये माधुरी अशीरगडे, नेहा जोशी, समीर नाफडे, सुमती वानखेडे, श्रीमती देसाई यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. शिवाली सावदेकर आणि एकता खंते यांनी या शोचे दिग्दर्शन केले. या दोघींनी सलग १० ते १५ दिवस ज्येष्ठ नागरिकांवर घेतलेली मेहनत त्यांना सलाम करणारी आहे. सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांचे निवेदन लाजवाब असे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीएसी ऑल राऊंडरचे अमोल खंते, चंदू पेंडके, विजय जथे यांनी सहकार्य केले.
हम भी है जवाँ..
ज्येष्ठांच्या फॅशन शोने मने जिंकली ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी धमाल मस्ती करीत तरुणाईला लाजवेल अशा वेगवेगळ्या वेषभूषेत रॅम्प वॉक करून रसिकांची मने जिंकली. ज्
First published on: 02-10-2013 at 08:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramp walk by olders