कसबा बावडा परिसरातील मराठा कॉलनी भागामध्ये शुक्रवारी रात्रीपाठोपाठ शनिवारीही चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. या भागात चार ठिकाणी चो-या करताना चोरटय़ांनी अडीच लाख रूपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. यापूर्वी शुगर मिल परिसरात सहा ठिकाणी घरफोडय़ा झाल्या होत्या. गृहराज्यमंत्री सतेज पाटील राहात असलेल्या कसबा बावडा परिसरात चोरीचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मराठा कॉलनी भागात चार घरफोडय़ा झाल्या.
माणिकराव महादेव साळोखे यांच्या अस्मिता बंगल्यात घुसून चोरटय़ांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. सुमारे आठ तोळे सोन्याचे व अडीच लाख रूपये किमतीचे दागिने चोरटय़ांनी चोरून नेले. याच परिसरात आणखी तीन ठिकाणी चोरटय़ांनी घरफोडी केली. मात्र, या ठिकाणी विद्यार्थी राहात असल्याने आणि ते परगावी गेले असल्याने नेमकी किती चोरी झाली याचा अंदाज आलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून कसबा बावडा भागात दहा ठिकाणी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी सकाळी चोरी झालेल्या ठिकाणी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनय सरवदे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ राठोड व सहका-यांनी भेट देऊन पाहणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा