विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाणवठय़ावर येणाऱ्या वन्यजीवांची गणना करण्यास गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील वन्यजीवसंरक्षण संस्थेच्या सदस्यांना यादरम्यान उडत्या खारीसह पक्षांमध्ये लुप्तप्राय समजला जाणारा ‘रानपिंगळा’ पक्षी आढळून आला. अगदीच नगण्य (केवळ दोन) संख्येत आढळलेल्या पक्षांमुळे वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईच्या टायगर काँन्झव्र्हेशन अँण्ड रिसर्च सेंटर या संस्थेतर्फे विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठय़ावर वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. त्या पथकात जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र सतीश कांबळे, रवींद्र सोनवणे, नीलेश तायडे, राजपाल शर्मा यांचा समावेश करण्यात आला होता. मुंबई आणि जळगाव जिल्ह्यातील या दोन्ही संस्थेतील संयुक्त पथकाने वन्यजीवांच्या प्रगणनेस सुरूवात केली. व्याघ्र प्रकल्पातील ‘हातूर’ (बफनझोन) या वाढीव वनक्षेत्रात वनरक्षक प्रशांत खाडे यांच्या मदतीने जंगलातील ‘डोलाराम’ कृत्रिम पाणवठय़ानजीकच्या मनोऱ्यावरून निरीक्षण व गणनेस सुरूवात झाली.
सुमारे बारा ते पंधरा किलोमीटर परिसरात तसेच सिवना परिसरात जंगलात भटकंती दरम्यान १०० हून अधिक वन्यप्राणी, पशु, पक्षी, आढळून आले. त्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला रानपिंगळा (केवळ दोन), उडती खार (फ्लाईंग स्क्विटल) १२ , भेकर ९, बिबटे ३, रान डुकर २२, रानगवे ६, चितळ ७, काळवीटांचे दोन कळप (प्रत्येकी सात ते आठचा एक कळप), काळ्या व लाल तोंडाची माकडे (लंगूर) ३५, कोतवाल ३ आदींसह केवळ एकमेव वाघाचे दर्शन झाले. यावेळी गुरेचराई व वृक्षतोड यांचे प्रमाणही अल्प आढळून आले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2013 रोजी प्रकाशित
मेळघाटात ‘रानपिंगळा’
विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाणवठय़ावर येणाऱ्या वन्यजीवांची गणना करण्यास गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील वन्यजीवसंरक्षण संस्थेच्या सदस्यांना यादरम्यान उडत्या खारीसह पक्षांमध्ये लुप्तप्राय समजला जाणारा ‘रानपिंगळा’ पक्षी आढळून आला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-06-2013 at 02:39 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranpingla bird in melghat