पुण्याच्या विवाहितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील अटक आरोपींना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश माळशिरसचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. बी. माने यांनी दिला आहे.
या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी सांगितले की, हडपसर येथे राहणारी ही विवाहिता पतीसह माहेरी विजयवाडी (ता. माळशिरस) येथे जाण्यासाठी २३ मार्च रोजी पुणे-पंढरपूर रस्त्यावरील निमगाव पाटी या ठिकाणी रात्री १० च्या सुमारास उतरले होते. एवढय़ात त्या ठिकाणी मोटारीतून आलेले योगेश इंगळे व त्याच्या ४ साथीदारांनी त्यांच्याशी भांडण केले. त्यामध्ये या पती-पत्नीला मारहाण करून मोटारीमध्ये घालून निमगाव मार्गे पिलीव गावाच्या पश्चिमेस डोंगरात निर्मनुष्य ठिकाणी विवाहितेवर दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर या महिलेने पुण्याला परत गेल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा वेळापूर पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर सोलापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. अकलूज विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. शिवशंकर बोंदर यांनी योगेश इंगळे यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.
 

Story img Loader