विदर्भात चर्चित सूरसंगम विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेत अकोल्याची रसिका बोरकर ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
साहित्य कला शोधक मंचातर्फे मोहम्मद रफी स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम २७ वषार्ंपासून घेण्यात येत आहे. विदर्भातून यावर्षी ८० स्पर्धक गायकांनी हजेरी लावली. त्यातून बारा स्पर्धकांची अंतिम फे रीसाठी निवड करण्यात आली होती. यात १५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार रसिका बोरकरने व दहा व सात हजाराचे द्वितीय व तृतीय पुरस्कार चंद्रपूरच्याच मुकेश मेहरा व राजू गोयल यांनी पटकावले. उर्वरित चैताली कुळकर्णी, मेघा मेंढे, श्रुती गुळतकर, विभोर गुज्जेवार (सर्व वर्धा), राणी पवार (मोर्शी), प्रवीण सुपारे (हिंगणघाट), अमर धिरा (चंद्रपूर) व श्याम अंभोरे (आकोट) यांना दोन हजार रुपयाचे प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. पहिल्या फे रीचे परीक्षण सुनील रहाटे, आनंद निधेकर व मेघा तुपकरस तर अंतिम फे रीचे परीक्षण धनंजय भट, श्रीकांत जांभूरे व वीणा उदापूरकर यांनी केले. पुरस्कार वितरण माजी आमदार सागर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक प्रदीप पाठक, मोहन अग्रवाल, काशीनाथ गावंडे, मनोहर पंचारिया, आयोजक संस्थाध्यक्ष अॅड. राजेंद्र खरे व सुनील बुरांडे यांची उपस्थिती होती. स्पर्धेत प्रत्येकी एक मराठी व हिंदी फि ल्मी गीत गाण्यासोबतच नव्या चित्रपटातील गीताची धून ऐकून गीत सादर करण्याचे बंधन होते. संपूर्ण आर्के स्ट्राची व्यवस्था असल्याने वर्धेकर रसिकांना दमदार सांगितिक मेजवानी लाभली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा