साईकृपा साखर कारखान्याने राहुरी तालुक्यातील सुमारे तीनशे शेतकऱ्यांचे अडीच ते तीन कोटी रूपये आठ दिवसांत न दिल्यास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्टीतील घरासमोर ठिय्या आंदोलनासह आमरण उपोषण करण्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र  मोरे यांनी आज मंगळवारी रास्ता रोको आंदोलनावेळी दिला.
  साईकृपा फेज २ साखर कारखान्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून सन २०१२-१३ या  हंगामातील उसाचे पसे आठ महिन्यांपासून न दिल्याने संतप्त झालेल्या ऊस उत्पादकांनी राहुरी खुर्द येथील मुळा नदीकाठावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांचे वतीने  नायब तहसीलदार  टी.जी. कोल्हे , पोलिस निरीक्षक अशोक रजपूत यांना निवेदन दिले. मोरे म्हणाले की,तालुक्यातील ऊस उत्पादकांनी मागील गाळप हंगामामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे मार्गदर्शनाखाली साईकृपा फेज दोनला हजारो टन ऊस दिला होता.त्यापोटी कारखान्याने गेल्या आठ महिन्यापासून रक्कम थकविली आहे.आज शेतकरी आíथक अडचणीत आहे. थकीत पेमेंट आठ दिवसांत न दिल्यास ठिय्या आंदोलनासह आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथे जाऊन समक्ष भेट घेऊन त्यांना परिस्थिती सांगणार आहे.त्यांचेकडून न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तर आगामी निवडणुकीत विरोधी काम करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता बनली आहे.
 केशव िशदे म्हणाले की, साईकृपा कारखान्याला साखरेचा भाव कमी मिळाला असल्याने परवडत नाही, मग संगमनेरला कसे परवडते. पाचपुते आमच्या जीवावर राजकारण करतात.शेतकऱ्यांच्या मतावर आमदार नामदार झालेले पाचपुते आता खासदारकीचे स्वप्न पाहत आहेत. आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त होती. आंदोलनात बाजार समितीचे संचालक सुनील मोरे, बाळासाहेब जाधव,प्रकाश देठे, प्रमोद पवार यांचेसह शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती.
शेतक-यांसाठी निधी नाही
साईकृपा कारखान्याला मदत करणाऱ्या नगरमधील एका नेत्याकडे २ कोटी रूपये बॅंकेतून काढून थकीत रकमेचा भरणा करण्यास पसा आहे.मात्र शेतकऱ्यांचे पसे देण्यास निधी उपलब्ध होऊ शकत नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र  मोरे यांनी केला.

Story img Loader