मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कृती समितीचे कार्याध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पेंडगाव येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला. केज येथेही याच मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
जिल्हय़ात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मागील महिन्यापासून आंदोलन पेटले आहे. मराठा समाजाच्या संघटनांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. मांजरसुंबा येथील रास्ता रोको आंदोलनानंतर पुन्हा याच मागणीसाठी गुरुवारी औरंगाबाद मार्गावर पेंडगाव येथे मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. समितीचे कार्याध्यक्ष जि. प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मागणी पूर्ण झाल्यानंतरच स्वस्थ बसू, असे सांगितले. माजी आमदार राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, कृषी सभापती युद्धाजित पंडित यांच्यासह नेते व कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
याच मागणीसाठी केजलाही शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन झाले. यात काँग्रेसचे अशोक िहगे, प्रा. हनुमंत भोसले, पशुपती दांगट, विनोद गुंड, छावाचे गंगाधर काळकुटे आदी सहभागी झाले होते.

Story img Loader