ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली माजरसुंभा येथे रविवारी दोन तास रास्ता रोको आदोलन करण्यात आले. क्षीरसागर रस्त्यावर उतरल्याने हे आंदोलन आक्रमक होईल असे मानले जाते. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण संघर्ष करणार असल्याची ग्वाही क्षीरसागर यांनी दिली. पहिल्यांदाच या मागणीसाठी ओबीसीचे नेतृत्व थेट रस्त्यावर आले आहे, हे विषेश.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात विविध संघटना व पक्ष आंदोलन करत आहेत. मराठा समाजाच्या विविध संघटनांनी ही मागणी पेटवली आहे. यासाठी राष्ट्रवादीचेच आमदार विनायक मेटे आरक्षण परिषदा घेत आहेत. त्यात काही ओबीसीचे नेते आरक्षणाला विरोध करतात, असा आरोपही केला जातो. यावर काही दिवसांपूर्वी माजलगावमध्ये सर्वपक्षीय रास्ता रोकोही झाला. मात्र ओबीसीचे नेते राष्ट्रवादीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे जिल्हा परिषदेतील शिक्षण व आरोग्य सभापती संदीप क्षीरसागर हे या आंदोलनात सक्रिय झाले आहेत. मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षणाची गरज आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे, अशी मागणी करत आरक्षण कृती समिती स्थापन करून रविवारी, १५ सप्टेंबर रोजी बीड तालुक्यातील मांजरसुभा येथे रास्ता रोको करण्यात आला. सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला. या वेळी कृती समितीचे गंगाधर घुमरे, बबन गवते, दिनकर कदम, सुग्रीव रसाळ, छावाचे अशोक रोमण यांच्यासह प्रमुख्य कार्यकत्रे होते.
मराठा आरक्षणासाठी संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली माजरसुंभा येथे रविवारी दोन तास रास्ता रोको आदोलन करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-09-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko under leadership of sandip kshirsagar for maratha reservation