आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आरोग्यमुक्त व ताणतणावविरहित जीवन जगण्याची कला शिकविणारे  रविशंकर २० नोव्हेंबर रोजी लोणार येथे येत असून, त्यानिमित्त सत्संग व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सत्संगासह शेतीविषयक सकारात्मक दृष्टीकोन यावर ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे जि.प.चे सदस्य बाळासाहेब दराडे यांनी सांगितले.
स्थानिक विश्राम भवनात या कार्यक्रमानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे प्रशिक्षक निलेश भोळे, चंदू पैठणे, वसंतराव सावळे, आदित्य पाटील, पोतदार, भूषण मोरे, डॉ. गोपाल उबरहंडे, संजय लोखंडे, जयराज कोलते, प्रदीप चवरे, प्रमोद कुळकर्णी, राजुदादा कदम, शोभाताई लहाने, रविंद्र लहाने आणि ज्येष्ठ व्हॉलिंटीअर बाळासाहेब चौधरी, रवी पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते.
रविशंकरजी यांचे २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान अकोला येथून हेलिकॉप्टरने लोणार येथे आगमन होईल. यावेळी ते सरपंच व नवनियुक्त ग्रा.पं.सदस्य, प.सं.-जि.प. सदस्यांना ग्रामविकासावर मार्गदर्शन करणार असून, या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार राहणार आहेत. याचवेळी शंकरा ग्राम परिवर्तन मॉडेल व पुस्तिकेचे
 प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर कृषीमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृषी मेळावा होणार आहे. यात विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे यासह सेंद्रीय शेती यावर मार्गदर्शन करणार आहे.
महादर्शन व सत्संगात तणावमुक्त व हिंसामुक्त जीवन जगण्यासाठी सुदर्शन क्रियेचे महत्व व त्याचबरोबर शेतकरी व युवा वर्गासाठी गुरुजींचे खास मार्गदर्शन होईल. यावेळी लोणारचा इतिहास यावरही त्यांचे मार्गदर्शन होईल.    

Story img Loader