कल्याण डोंबिवली पालिका परिवहन समितीच्या सभापतिपदी गुरुवारी शिवसेनेचे रवींद्र कपोते यांची निवडणूक पद्धतीने निवड झाली. या पदासाठी मनसेतर्फे इरफान शेख, काँग्रेसतर्फे आरिफ पठाण यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.
जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेत कपोते यांना ११ पैकी ६ मते मिळाल्याने त्यांची सभापतिपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनेचे कल्याण शहरप्रमुख म्हणून कपोते यांनी यापूर्वी काम केले आहे. मात्र गेली काही वर्षे पक्षाच्या प्रभावी कामापासून त्यांना दूर ठेवल्याचे चित्र होते.

Story img Loader