विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना, विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे संजय शिरसाट आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यात वाद झाला. जितेंद्र आव्हाडांनी संविधानाची प्रत दाखवून शिरसाटांना घेरलं, ज्यावर शिरसाटांनी मुसलमानांवर विश्वासाचा मुद्दा उपस्थित केला. वाद वाढत असताना, तिन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी घोळका केला होता.