शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याचे वृत्त दुपारी वाऱ्यासारखे पसरले आणि त्यांचा सहवास लाभलेले अनेकजण शोकाकुल झाले. शिवसेनेतील सामान्य कार्यकर्ते ते नगरसेवक, आमदार तसेच कलाकार मंडळीही बाळासाहेबांच्या आठवणींनी व्याकूळ झाली..

एक स्वप्न धुरे राहिले..
बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा कलाकारांसाठी खूप महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे दादा कोंडके नावाच्या एका तडफदार कलाकाराला त्याच्या सुरुवातीच्या काळात हात दिला. दादांचा ‘सोंगाडय़ा’ हा चित्रपट दादरच्या ‘कोहिनूर’ला लागला होता. तो चित्रपट दहा आठवडे चांगला दणक्यात चालू होता. तरीही ‘कोहिनूर’वाले तो चित्रपट काढायचा विचार करत होते. त्यावेळी बाळासाहेबांनी ‘कोहिनूर’वाल्यांना समज दिली आणि तो चित्रपट तब्बल ५० आठवडे चालला होता. त्यानंतर दादा कोंडके लोकांना माहीत झाले. त्यानंतरही शिवसेनेच्या दबदब्यामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत राहिली. गेले काही दिवस त्यांची तब्येत खालावली होती. पण तरीही ते आहेत, हा दिलासा आणि आधार होता. पण आज तो आधारवड कोसळला आहे. बाळासाहेब खूप मनमोकळ्या गप्पा मारायचे. सलग महिनाभर रोज तास-दीड तास त्यांच्याशी गप्पा मारून त्या रेकॉर्ड करण्याचे माझे स्वप्न होते. पण ते स्वप्न आता अधुरे राहिले.
महेश मांजरेकर, दिग्दर्शक.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”

‘मराठी बाणा’ जपला!
चौरंग प्रतिष्ठान आणि आमच्या सगळ्या कार्यक्रमांना बाळासाहेब आणि शिवसेना यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. षण्मुखानंदला शिवसेनेचा एक कार्यक्रम होता. त्यात आमचाही एक कार्यक्रम होता. त्यावेळी मला सांगण्यात आले की, बाळासाहेब आल्यानंतर कार्यक्रम थांबवा. पण मी बाळासाहेबांसमोरच सांगितले होते की, कार्यक्रम मध्यंतरातच थांबेल. त्यांनाही ते आवडले. त्यांनीही त्यावर जोर दिला आणि माझे कौतुक केले. त्यापुढे माझ्या प्रत्येक कार्यक्रमात अगदी पंतप्रधानही आले, तरी तो कार्यक्रम मध्यंतराशिवाय कधीच थांबला नाही. आम्ही लंडनला जाण्याआधी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी बाळासाहेबांनी आमच्या हातावर साखर ठेवली होती आणि माँसाहेबांनी आम्हाला कुंकुमतिलक लावला होता. ती आठवण तर आजही मनात ताजी आहे. ‘मराठी बाणा’ची पहिली जाहिरात जाहीर झाली, त्यानंतर त्यांनी लगेचच दूरध्वनीवरून त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हा कार्यक्रम करण्याची विनंती केली होती. हा कार्यक्रम पाहून त्यांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षांव केला होता. आतापर्यंत मी माझा कोणताही प्रयोग रद्द केला नाही. अगदी माझ्या आईच्या निधनानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीचा प्रयोगही आम्ही केला होता. पण आज मात्र मी माझा एक प्रयोग रद्द केलाय. मी आता उभाच राहू शकत नाही.
– अशोक हांडे, चौरंग प्रतिष्ठान.

पितृत्युल्य, प्रेमळ..
बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेनेच्या शाखा बांधणीला सुरूवात केली तेव्हापासून माझे त्यांच्याशी संबंध आहेत. त्यांच्याबद्दलच्या पुष्कळ आठवणी आहेत. ते ज्यांच्यावर प्रेम करायचे त्यांना खुल्या दिलाने मदतही करायचे आणि काही चुकले असेल तर कोणाचीही वाट न बघता तितकेच रागवायचे. मात्र, राग संपला की पुन्हा तितक्याच प्रेमाने साद घालायचे. माझ्या ‘सर्जा’ या चित्रपटासाठी त्यांनी खूप मदत केली होती. सर्जा हा चित्रपट ऐतिहासिक होता. त्या चित्रपटासाठी मला ५०० अतिरिक्त कलाकार हवे होते. त्याकाळी या कलाकारांना प्रत्येकी साडेचारशे रूपये मोजावे लागत. बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना सांगितले की दोन दिवस रमेशच्या चित्रिकरणाला जायचे, आपला जेवणाचा डबाही घरून घेऊन जायचा आणि त्यांच्याकडून कोणतेही पैसे घ्यायचे नाहीत. बाळासाहेबांच्या शब्दांवर पाचशे शिवसैनिकांनी चित्रिकरणासाठी दोन दिवस दिले. चित्रपट पूर्ण झाल्यावर त्याचा विशेष शो तत्कालिन मुख्यमंत्र्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.
या शोच्या वेळी शिवसैनिकांची नावे असलेली श्रेयनामावलीच काढून टाकण्यात आली, अशी माहिती कोणीतरी बाळासाहेबांना दिली. त्यांनी मला ताबडतोब बोलावून घेतले आणि म्हणाले, ‘तुला काय माज आला आहे का’? मी गोंधळून गेलो. ‘शिवसैनिकांनी तुला एवढी मदत के ली आणि मुख्यमंत्र्यांसाठी शो करताना तु त्यांची नावे असलेली यादी का काढून टाकलीस?’, असे त्यांनी सांगताच मी त्यांना कुठलाही चित्रपट सुरू झाल्यावर मध्येच असा एखादा प्रसंग काढून टाकता येत नाही, हे स्पष्ट केले.
मी स्वत मनाने सच्चा शिवसैनिक असताना असे कृत्य मी का करेन, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असे सांगितल्यावर त्यांचा राग शांत झाला. मला असे कळाले होते म्हणून तुला जाब विचारला पण, तुझ्या शब्दांवर माझा विश्वास आहे, असे हसत हसत सांगितले. आणि त्यानिमित्ताने का होईना तुझी माझी भेट तर झाली असे सांगत मला घरी पाठवून दिले. ते नेहमी गोड बोलायचे आणि मार्मिक बोलायचे. बऱ्याचदा निराश मनस्थितीत त्यांना भेटायला जावे आणि त्यांच्या घरातून बाहेर पडताना हसत बाहेर पडावे, अशी स्थिती मी अनुभवली आहे.
    – रमेश देव

सहह्रदय बाळासाहेब
चाळीत राहणाऱ्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला शिवसेनाप्रमुखांनी महापौरपदी विराजमान केले आणि मी परिवारासह महापौर बंगल्यावर वास्तव्यासाठी गेलो. शिवसेनाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकरांना सुविधा उपलब्ध करण्याचे काम जोमाने करीत होतो. महापौरपदाचा कालावधी संपुष्टात येत होता आणि पुन्हा चाळीतील घरात राहायला जावे लागणार होते. त्यावेळचे मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मला एके दिवशी बोलावून घेतले आणि १० टक्क्यामध्ये घर देऊ केले. पण बाळासाहेबांची परवानगी मिळाल्याशिवाय ते घ्यायचे नाही असा निर्णय घेऊन मी तडक त्यांना भेटायला गेलो. मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेल्या घराबाबतची माहिती त्यांना दिली. त्यांनी तात्काळ घर घेऊन टाक असे सांगितले. इतकेच नव्हे तर घर घेण्यासाठी तुझ्याकडे पैसे आहेत का? लागतील तेवढे पैसे माझ्याकडून घेऊन जा, असा आदेशच दिला. पण माझ्याकडे पैसे आहेत सांगून मी वेळ मारुन नेली. मी नगरसेवक झालो, त्यानंतर बाजार आणि उद्यान समिती, तसेच प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यावर टाकली व ती मी समर्थपणे पेलली. आपण महापौरपदी विराजमान होऊ हे स्वप्नातही मी कधी पाहिले नव्हते. पण केवळ शिवसेनाप्रमुखांमुळेच मी त्या पदाचा मानकरी झालो. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज होता. तोच आज हरपला आणि आम्ही सारे पोरके झालो.
    -माजी महापौर महादेव देवळे

माझे शिक्षण अकरावीपर्यंत झालेले. तेही गावाकडे. गाडय़ा धुत धुत मोठा झालेलो. १९७० मध्ये पहिल्यांदा शिवसेनाप्रमुखांची भेट झाली. परंतु त्यानंतर माझे आयुष्यच बदलले. आज माझ्याकडे मोठमोठय़ा गाडय़ा आहेत. हे सर्व बाळासाहेबांमुळेच शक्य झाले. माझे सुदैव की, बाळासाहेबांच्या खूप जवळ होतो. बाळासाहेबांच्या दौऱ्यात त्यांच्याबरोबर मी बऱ्याचवेळा असायचो. प्रत्येकवेळी त्यांच्यातील एका वेगळ्या अवताराचा अनुभव यायचा. असे किस्से खूप आहेत. एकदा निवडणूक दौऱ्यासाठी धुळ्याला चाललो होतो. वाटेत नाशिकला हॉटेलवर थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचे होते. लिफ्ट तयार होती. परंतु बाळासाहेब म्हणाले, पायऱ्यांनी जाऊ. परंतु बाळासाहेबांचे स्वीय सहायक मोरेश्वर राजे तोपर्यंत लिफ्टमध्ये चढले होते. परंतु ती लिफ्ट नेमकी बंद पडली. तेव्हा राजेंची शोधाशोध सुरू झाली. बाळासाहेब ज्या गाडीने प्रवास करीत होते त्या गाडीचा चालक बाबा शिंदेला ते म्हणाले, असे बाबा.. टायरमधली हवा तपासलीस ना.. शिंदे खाली उतरला तेव्हा एका टायरमध्ये हवाच नव्हती. याच गाडीचे सर्व टायर नंतर फुटले. माझ्या आयुष्यात बाळासाहेब नसते तर मात्र मी कायम सामान्यच राहिलो असतो..
    –जयवंत परब

सच्च्या शिवसैनिकाला न्याय दिला..
गिरगावच्या नाक्यावरील मी एक शिवसैनिक. परंतु बाळासाहेबांमुळेच आमदारही झालो. स्वप्नातही जे पाहिले नव्हते ते बाळासाहेबांमुळे मिळाले. ११ जुलै २००० चा दिवस. मुंबईत तुफान पाऊस पडत होता. मी स्कूटरने माझ्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजे देना बँकेत गेलो. तेव्हा बाळासाहेबांचा फोन आला. काय करतो आहेस.. बँकेत तुला किती पगार मिळतो.. त्यानंतर ते म्हणाले उद्या जाऊन परिषदेचा फॉर्म भर.. मला विश्वासच बसत नव्हता. शाखाप्रमुख, नगरसेवक म्हणून बाळासाहेबांशी सतत संपर्क आला. माझा प्रभाग राखीव झाल्यानंतर एक शिवसैनिक म्हणून काम करीत होतो. परंतु बाळासाहेबांनी अगदी लक्षात ठेवून बोलावून घेतले आणि मला आमदार केले.
    – विलास अवचट

मी पाहिलेले बाळासाहेब
शिवसेनाप्रमुखांचे सर्वात महत्त्वाचे वैशिटय़ म्हणजे त्यांचे निर्मळ व प्रेमळ मन. त्यांच्या स्वभावाचा प्रत्यय अनेकदा यायचा. महापौरपदी निवड झाल्यानंतर न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर जाण्याची संधी मला मिळाली. मी जाण्याच्या तयारीत असताना बाळासाहेबांचा फोन आला की अमेरिकेहून आलात की येऊन भेटा. मनात थोडी धाकधूक होती. तिकडे केलेल्या भाषणाची प्रत घेऊनच भेटायला गेले. त्यांच्यासमोर जाताच ‘मी तुमच्यासाठी एक भेटवस्तू ठेवली आहे.’ असे सांगत बाळासाहेबांनी एक क्षणात दडपण कमी केले. मी पाहिले तर तो एक अल्बम होता. महापौरपदी निवडून आल्यापासून माझ्याबाबत आलेल्या प्रमुख बातम्या व छायाचित्रे यांची कात्रणे त्यांनी एकत्र करून त्यांचा अल्बम तयार केला होता. ते पाहून माझ्या डोळय़ांत पाणी आले. त्या अल्बमवर बाळासाहेबांनी द्वारा शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे असे लिहून दिले. माझ्यासाठी तो आयुष्यभराचा ठेवा आहे. न्यूयॉर्क दौऱ्यात काय काय पाहिले याची माहिती मी बाळासाहेबांना दिली. तेथील लोकांनी डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न कसा सोडवला आहे त्याची माहिती दिली. त्यावर हे सारे मुंबईत करा. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नंतर गोराई डंपिंग ग्राऊंड झाले. तेव्हा ‘महापौर महोदय तुम्ही पाहून आलात ते केलेत’, असा शाबासकी देणारा फोनही त्यांनी केला.
    -माजी महापौर शुभा राऊळ

बाळासाहेब हे देखील शाहिरी वृत्तीचे!
बाळासाहेबांनी माझ्या वडिलांवर, लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यावर, खूप मनापासून प्रेम केले. ते कधीच व्यासपीठावर कोणाला बसून देत नसत. पण त्यांच्या हस्ते बाबांचा सत्कार होता, त्यावेळी मात्र त्यांनी स्वतहून बाबांना बसवून त्यांचा सत्कार केला होता. त्यांचे हे प्रेम सगळ्या उमप घराण्यावर होते. नव्हे, सगळ्या कलाकारांवर होते. ते एकदा बाबांबद्दल म्हणाले होते की, थापा मारणारे अनेक कलाकार आहेत. पण लोकशाहिरांसारखी डफावर थाप मारणारा कलाकार खूप वर्षांनी एकदा होतो. तसे पाहायला गेले, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची शाहिरी वृत्ती त्यांच्यातही होती. फक्त ते आपल्या भाषणांतून त्या अन्यायावर आसूड ओढायचे. बाबांच्या निधनाआधी काही महिने त्यांनी बाळासाहेबांसाठी एक पोवाडा गायला होता. आता तो पोवाडा पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
    – नंदेश उमप, गायक

कधीही न पडणारी स्वप्नेही प्रत्यक्षात आली
कुठलीही पाश्र्वभूमी नसताना केवळ शिवसेनाप्रमुखांमुळेच कधीही न पडणारी स्वप्नेही प्रत्यक्षात आली. बाळासाहेब गेले आणि सारे संपलेच, असे वाटू लागले आहे. मी खूपच सामान्य शिवसैनिक होतो. परंतु बाळासाहेबांमुळेच मानाने वावरत आहे. मला आता काही सुचतच नाही.
    -शैलेश फणसे, सभागृह नेते

Story img Loader