महाराष्ट्रभर वाचन संस्कृतीचे जाळे विस्तारणाऱ्या, सुमारे दोन लाखांची ग्रंथसंपदा असलेल्या डोंबिवलीतील पै फ्रेन्ड्स वाचनालयाने १ मार्च ते ३ मार्च या कालावधीत सर्वेश सभागृहात वाचकोत्सव आणि भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
वाचकोत्सवाचे औचित्य साधून २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता डोंबिवलीत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकनगरमधील पै फ्रेन्ड्स वाचनालय, टिळक पुतळा, ब्राह्मण सभा, फडके रोड, मानपाडा रोडने पुन्हा पै फ्रेन्ड्स लायब्ररी येथे ग्रंथदिंडी समाप्त होईल. साहित्यप्रेमी, रसिक, विद्यार्थी ग्रंथदिंडीत सहभागी होणार आहेत.
१ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता म्हैसकर फाऊंडेशनच्या संचालिका सुधाताई म्हैसकर यांच्या हस्ते वाचकोत्सवाचे उद्घाटन होईल. संध्याकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ लेखिका वैजयंती काळे ‘माझा लेखन प्रवास’ विषयावर पहिले पुष्प गुंफतील. या वेळी पत्रकार मीना गोडखिंडी लिखित ‘संक्षिप्त पेशवाई’चे प्रकाशन करण्यात येईल. २ मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता लेखक विवेक मेहेत्रे यांचा ‘हास्यकॉर्नर-इंटरनेटची धमाल’ कार्यक्रम होणार आहे. ३ मार्च रोजी विज्ञानलेखक प्रा. मोहन आपटे यांचे ‘भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार’ विषयावर संध्याकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे. वाचनालयाचे संचालक पुंडलिक पै, आनंद डिचोलकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. वाचकप्रेमींना मोठय़ा संख्येने या वाचकोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क ९८२०४४२२५२.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा