लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असताना िहगोली लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळेल, याबाबत दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये खुलेआम दावा केला जात असला तरी मैत्रीपूर्ण लढत झाली, तरीही आपण लढण्यासाठी सज्ज असल्याचे माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी स्पष्ट केले.
िहगोली लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी १९९८-१९९९ व २००४-२००९ या कालावधीत िहगोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. सूर्यकांता पाटील यांच्या समर्थकांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोच्रेबांधणी सुरू केली असतानाच काँग्रेस नेत्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांचे विश्वासू आमदार राजीव सातव यांनी िहगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आमदार सातव यांनी िहगोली मतदारसंघ काँग्रेसला सुटणार असल्याचे सूतोवाच करीत आपल्या समर्थकांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार सातव यांच्या व्यतिरिक्त जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष नामदेवराव केशवे यांनीही िहगोली लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सातव तसेच केशवे यांच्या व्यतिरिक्त सध्यातरी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढविण्यास कोणीही तयार नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीतर्फे सूर्यकांता पाटील यांचा दावा आहे. शिवाय दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेले विधीज्ञ िहगोली लोकसभेसाठी इच्छूक आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या दाव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी आज फेसबुकवरून चक्क काँग्रेस नेत्यांना आव्हान दिले आहे. काँग्रेसचे नेते ही जागा काँग्रेसला सुटणार आहे, आमचा उमेदवार जिंकणार आहे, असे भाषणात जाहीरपणे सांगत आहेत. राजकारणातले सगळे संकेत गुंडाळून जे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे त्यामुळेच मी माझी भावना व्यक्त करीत आहे. राष्ट्रवादीविरुद्ध काँग्रेस सामना होऊन जाऊ द्या, त्यासाठी माझी तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
 सातव यांचा दावा, नामदेवराव केशवे यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर सूर्यकांता पाटील यांनी दिलेले आव्हान यामुळे िहगोली लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा